r/marathi • • 18h ago Bravo

चर्चा (Discussion) My experience with Marathi in Maharashtra vs Goa

51 Upvotes

So, I am Marathi, from somewhere close to Mumbai, a native. Since childhood, I've had this unconsciously ingrained belief that Marathi is for home and Hindi is for outside. I never questioned it until recently with all this language discussion going on. Even when we used to travel within Maharashtra, like to Ashtavinayak or Lonavala.

In Lonavala, for example, one lady only switched to Marathi after my mom made her open the hotel shop.

My family visited Goa for the first time, and this was the first time I ever heard so much Marathi outside my home and family circle. We stayed in one of the Fairfield properties, which is a fairly fancy hotel. The staff was from all over the country, but as soon as they read our surname or heard us talking in Marathi with each other, they would switch. The taxi driver was from the north, but he would also switch, as did people selling small wares on the beach.

why do we hesitate so much in Maharashtra? This is the "normality" that south states project. This is why people think they'll survive generations in Maharashtra without learning Hindi


r/marathi • • 1d ago

चर्चा (Discussion) राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी

3 Upvotes

राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी

हुश्श! २०१९ मध्ये घेतलेले ‘राग दरबारी’ आता २०२६ मध्ये वाचून झाले. वाचून झाले याऐवजी ‘ऐकून झाले’ असं म्हणावं, तर त्रिलोक पटेल यांनी छान वाचलं आहे, स्टोरीटेलवरती. स्टोरीटेलवरती खूप साऱ्या मराठी आणि हिंदी पुस्तकांचा खजिनाच आहे. कँडी स्टोअरमधल्या मुलासारखा त्यावरती फडशा पाडण्याचा माझा मनोदय आहे.

श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’वर एवढं सारं लिहून आलं आहे की मी त्याचा परामर्श घेणार नाही. ‘कॅच ट्वेंटी टू’, ‘ॲनिमल फार्म’सारखीच ही एक अति उत्तम व्यंग, सटायर कादंबरी आहे. शिवपालगंज या एका छोट्या शहरामध्ये ती घडते. शुक्लांनी ती १९६४ ते १९६७ दरम्यान लिहिली व १९६८ साली प्रकाशित केली. त्यामुळे ती तशा तुलनेने नवीन भारतात घडली. साधारण स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिल्या दोन दशकांत. त्यामुळे कथेवर स्वातंत्र्यलढ्याच्या छटा आहेतच.

मी इथे माझ्या शालेय जीवनातील दोन प्रसंग सांगणार आहे व त्या प्रसंगांवरून श्रीलालजी अजूनही का वाचले जातात, त्याची प्रतीती देणार आहे.

माझे वझे सर. वझे सरांनी आम्हाला प्रत्यक्ष शाळेत कधी शिकवले नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी आम्हाला वाचन कसे करावे व शब्दकोश कसा वापरावा यावरती आठवीत सेमिनार घेऊन शिकवले होते. वझे सर ‘ट्रेन द ट्रेनर’ या तत्त्वाचा वापर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यातील इंग्रजी शिक्षकांना कसे शिकवावे यासाठी सेमिनार घेत असत. ही शिबिरे अर्थातच फुकट व वझे सरांच्या घरीच असायची. शिक्षकांना गार पाणी, गार कलिंगडं खायला असावीत म्हणून वझे सरांनी रेफ्रिजरेटर पण घेतला होता. हा सगळा तुकारामी व्यापार वझे सर, व वझे बाईंची त्यांना खंबीर साथ होती म्हणून, करायचे, हे सांगणे न लगे.

तर त्या काळी, म्हणजे साधारण १९६५ च्या दरम्यान, इंग्लिश व मराठीमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून एम.ए. केलेल्या वझे सरांनी पुण्यात मिळणाऱ्या नोकरीचा त्याग करून गोव्यात शिक्षक म्हणून येण्यावर भर दिला. त्यांना म्हापसा येथील प्रतिष्ठित शाळांमध्ये ‘राग दरबारी’सारखेच खोट्या सह्या करणे इत्यादी इत्यादी प्रसंगांना सामोरे जावे लागले. आणि अर्थातच त्यामुळे त्यांना नोकरी सोडून दुसरी नोकरी धरणे या गोष्टी कराव्या लागल्या.

आज मला वझे सरांना आणि त्यांच्या त्या काळच्या एकूणच पिढीला नेहरूंच्या “एक बगल में चाँद होगा, एक बगल में रोटियाँ” या ग्वाहीवरती विश्वास होता असे वाटते. तो विश्वास कितपत रास्त होता ते त्या भारतमातेलाच ठाऊक.

माझे संजय सर. संजय सर म्हणजे आमचे मराठीचे सर. त्यांनी पण मराठीमध्ये एम.ए. केलं होतं व त्यांना पेटीवादनाचा फार छंद होता. संजय सर २००० सालीच गेले. रिटायरमेंट बहुतेक नुकतीच सुरू झाली होती आणि ते त्यातच गेले. मी खूप शिकावं, अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. घ्यावी अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि त्याबाबत ते वेळोवेळी माझ्या वडिलांकडे तशी चौकशी पण करायचे.

तर गोव्यातील विकास शिक्षण संस्थेमध्ये सरांना नोकरी करण्यासाठी मोठी देणगी द्यावी लागली होती व सर त्या रकमेची अदाई त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत करत होते. राष्ट्रकार्य करणाऱ्या शिक्षकाला व्यवस्था भ्रष्टाचाराला आहुती द्यायला लावत होती, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. आणि हे सारे असूनही, फक्त बेरकी नसल्यामुळेच सर विद्यादान करत होते प्रामाणिकपणे. खरोखर उजव्या विचारांचे असते तर त्यांनी छानपैकी आटा चक्की सुरू केली असती किंवा सरळ राजकारणाकडे मोर्चा उठवला असता.

आणि गंमत म्हणजे हा भ्रष्टाचार आपण सिनेमामध्ये बघतो तसा ब्लेटंट भ्रष्टाचार नव्हता. आणि सरकारे आली आणि गेली तरी तो अव्याहतपणे तसाच चालू होता, शांतपणे. कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नव्हते व कुणाला त्याबद्दल वाईटही वाटत नव्हते.

शुक्लांच्या ‘राग दरबारी’मुळे हे सगळे थोडे आठवले आणि म्हणून मी ते लिहून ठेवले. काही स्मृतीच म्हणा ना.

आता साल २०२६ मध्ये आपल्या भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. त्यामुळे चित्र बदलले, पोरे शिकतील, भारताची ‘सोने की चिडिया’ परत येईल, असा मला दृढ विश्वास आहे. कारण hope is a good thing.

आणि हे सगळं आठवून द्यायला श्रीलाल शुक्लांसारखा समर्थ लेखक मदत करतो. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्रिलोक पटेलांचे पण आभार.

धन्यवाद.

https://priyaranjanmarathe.substack.com/p/23c?r=5d03f&utm_medium=ios

https://www.goodreads.com/review/show/9120875376?ref_src=ios_share


r/marathi • • 2d ago

चर्चा (Discussion) Ethnic marathi hindi speakers are cooked

0 Upvotes
  1. You will be outed by local marathis and treated like an outsider too. Keep speaking or switch to hindi, you are biting your own foot.
  2. You will lose abroad opportunities. You could have spent that time being proficient in english or learning languages like german, french, spanish for abroad opportunities. You spend time getting proficient in useless language. (I wish my school had taught me german rather than hindi, I would have had a better career)

The ultimate loosers in this situation are hindi speaking marathis


r/marathi • • 3d ago

General Origin of word 𑘩𑘻𑘜𑘲/लोणी in Marathi

Post image
15 Upvotes

r/marathi • • 3d ago

मराठी भाषाशास्त्र (Marathi Linguistics) Do y’all consider Varhadi to be “गावठी”?

18 Upvotes

I’ve noticed that a lot of people consider Varhadi to be uncultured, they consider it as “गावठी”. Being a Varhadi speaker myself, I have also succumbed to this mentality and I’m guilty of it. Infact, I rethink my choice of word every single time. I try to stay as close as I can to Standard Marathi. This adds a lot of stress if I’m talking to a Marathi person both in-person and on text. I don’t have situations where I’ll have to converse with someone in Marathi because I’m not from Maharashtra and never lived there, but if I do have such situation, it’s very tiresome. Do people really care about what dialect someone is conversing in-person or Is it just an online thing? आपले टिप्पणी प्रदान करा!


r/marathi • • 3d ago

चर्चा (Discussion) राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी

4 Upvotes

राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी

हुश्श! २०१९ मध्ये घेतलेले ‘राग दरबारी’ आता २०२६ मध्ये वाचून झाले. वाचून झाले याऐवजी ‘ऐकून झाले’ असं म्हणावं, तर त्रिलोक पटेल यांनी छान वाचलं आहे, स्टोरीटेलवरती. स्टोरीटेलवरती खूप साऱ्या मराठी आणि हिंदी पुस्तकांचा खजिनाच आहे. कँडी स्टोअरमधल्या मुलासारखा त्यावरती फडशा पाडण्याचा माझा मनोदय आहे.

श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’वर एवढं सारं लिहून आलं आहे की मी त्याचा परामर्श घेणार नाही. ‘कॅच ट्वेंटी टू’, ‘ॲनिमल फार्म’सारखीच ही एक अति उत्तम व्यंग, सटायर कादंबरी आहे. शिवपालगंज या एका छोट्या शहरामध्ये ती घडते. शुक्लांनी ती १९६४ ते १९६७ दरम्यान लिहिली व १९६८ साली प्रकाशित केली. त्यामुळे ती तशा तुलनेने नवीन भारतात घडली. साधारण स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिल्या दोन दशकांत. त्यामुळे कथेवर स्वातंत्र्यलढ्याच्या छटा आहेतच.

मी इथे माझ्या शालेय जीवनातील दोन प्रसंग सांगणार आहे व त्या प्रसंगांवरून श्रीलालजी अजूनही का वाचले जातात, त्याची प्रतीती देणार आहे.

माझे वझे सर. वझे सरांनी आम्हाला प्रत्यक्ष शाळेत कधी शिकवले नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी आम्हाला वाचन कसे करावे व शब्दकोश कसा वापरावा यावरती आठवीत सेमिनार घेऊन शिकवले होते. वझे सर ‘ट्रेन द ट्रेनर’ या तत्त्वाचा वापर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यातील इंग्रजी शिक्षकांना कसे शिकवावे यासाठी सेमिनार घेत असत. ही शिबिरे अर्थातच फुकट व वझे सरांच्या घरीच असायची. शिक्षकांना गार पाणी, गार कलिंगडं खायला असावीत म्हणून वझे सरांनी रेफ्रिजरेटर पण घेतला होता. हा सगळा तुकारामी व्यापार वझे सर, व वझे बाईंची त्यांना खंबीर साथ होती म्हणून, करायचे, हे सांगणे न लगे.

तर त्या काळी, म्हणजे साधारण १९६५ च्या दरम्यान, इंग्लिश व मराठीमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून एम.ए. केलेल्या वझे सरांनी पुण्यात मिळणाऱ्या नोकरीचा त्याग करून गोव्यात शिक्षक म्हणून येण्यावर भर दिला. त्यांना म्हापसा येथील प्रतिष्ठित शाळांमध्ये ‘राग दरबारी’सारखेच खोट्या सह्या करणे इत्यादी इत्यादी प्रसंगांना सामोरे जावे लागले. आणि अर्थातच त्यामुळे त्यांना नोकरी सोडून दुसरी नोकरी धरणे या गोष्टी कराव्या लागल्या.

आज मला वझे सरांना आणि त्यांच्या त्या काळच्या एकूणच पिढीला नेहरूंच्या “एक बगल में चाँद होगा, एक बगल में रोटियाँ” या ग्वाहीवरती विश्वास होता असे वाटते. तो विश्वास कितपत रास्त होता ते त्या भारतमातेलाच ठाऊक.

माझे संजय सर. संजय सर म्हणजे आमचे मराठीचे सर. त्यांनी पण मराठीमध्ये एम.ए. केलं होतं व त्यांना पेटीवादनाचा फार छंद होता. संजय सर २००० सालीच गेले. रिटायरमेंट बहुतेक नुकतीच सुरू झाली होती आणि ते त्यातच गेले. मी खूप शिकावं, अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. घ्यावी अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि त्याबाबत ते वेळोवेळी माझ्या वडिलांकडे तशी चौकशी पण करायचे.

तर गोव्यातील विकास शिक्षण संस्थेमध्ये सरांना नोकरी करण्यासाठी मोठी देणगी द्यावी लागली होती व सर त्या रकमेची अदाई त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत करत होते. राष्ट्रकार्य करणाऱ्या शिक्षकाला व्यवस्था भ्रष्टाचाराला आहुती द्यायला लावत होती, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. आणि हे सारे असूनही, फक्त बेरकी नसल्यामुळेच सर विद्यादान करत होते प्रामाणिकपणे. खरोखर उजव्या विचारांचे असते तर त्यांनी छानपैकी आटा चक्की सुरू केली असती किंवा सरळ राजकारणाकडे मोर्चा उठवला असता.

आणि गंमत म्हणजे हा भ्रष्टाचार आपण सिनेमामध्ये बघतो तसा ब्लेटंट भ्रष्टाचार नव्हता. आणि सरकारे आली आणि गेली तरी तो अव्याहतपणे तसाच चालू होता, शांतपणे. कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नव्हते व कुणाला त्याबद्दल वाईटही वाटत नव्हते.

शुक्लांच्या ‘राग दरबारी’मुळे हे सगळे थोडे आठवले आणि म्हणून मी ते लिहून ठेवले. काही स्मृतीच म्हणा ना.

आता साल २०२६ मध्ये आपल्या भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. त्यामुळे चित्र बदलले, पोरे शिकतील, भारताची ‘सोने की चिडिया’ परत येईल, असा मला दृढ विश्वास आहे. कारण hope is a good thing.

आणि हे सगळं आठवून द्यायला श्रीलाल शुक्लांसारखा समर्थ लेखक मदत करतो. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्रिलोक पटेलांचे पण आभार.

धन्यवाद.

https://priyaranjanmarathe.substack.com/p/23c?r=5d03f&utm_medium=ios

https://www.goodreads.com/review/show/9120875376?ref_src=ios_share


r/marathi • • 4d ago

प्रश्न (Question) कुणाला "कचण्या" हा शब्द माहिती आहे का ?

6 Upvotes

Ha शब्द आनंद यादव यांच्या पुस्तकातील आहे.


r/marathi • • 5d ago

General Origin of word 𑘤𑘰𑘝𑘦𑘲/बातमी in Marathi

Post image
18 Upvotes

r/marathi • • 6d ago

प्रश्न (Question) कोणी जुनी मराठी मधे आहेत का? जे संत वाणी, अभंग आदी मधे असते

6 Upvotes

‌ ‌


r/marathi • • 7d ago Regret

चर्चा (Discussion) Is Maharashtra's Cultural Identity and Public Space Being Taken for Granted?

24 Upvotes

Source: https://www.instagram.com/reel/Df2AxecMunM/

This video is from Khadakwasla, Pune district. Large portions of the dam side area appear to have been marked with oil paint, with Chhath Puja inscriptions and boundary like markings.

And this raises an uncomfortable question: What exactly is happening to Maharashtra?

Maharashtra has a distinct linguistic, cultural and historical identity. Yet whenever questions are raised about cultural imposition, the discussion is conveniently turned into accusations of hatred, intolerance and xenophobia.

Why should questioning the growing assertion of outside cultural identities over local spaces automatically be labelled as hatred?

Marathi people are constantly expected to accommodate, adjust and remain silent, while any questioning of such practices is portrayed as an attack on diversity.

This isn't about whether someone should celebrate Chhath Puja. It is about the growing sense that Maharashtra's existing cultural identity and local sentiments can be disregarded whenever politically convenient.

And where are the political parties and leaders who constantly speak about Maharashtra's identity? Why does cultural identity suddenly become a selective issue when electoral calculations enter the picture?

A state cannot celebrate diversity while treating its own linguistic and cultural identity as something that must always take a backseat.

Maharashtra is not culturally identity-less territory. Marathi identity, history, language and traditions deserve recognition and respect too.

At what point does accommodation become a one sided expectation from the local population?


r/marathi • • 7d ago

चर्चा (Discussion) नो वकीलपत्र - साने गुरुजी

4 Upvotes

नो वकीलपत्र
“मेरे राम, मेरे राम, जय जय राम.” लहानगीने हळूच गुणगुणायला सुरुवात केली. आम्ही टेलर स्विफ्टची आणि तिने आमच्या सगळ्या संगीताची चेष्टा करणे हा रोजचा परिपाठ. या पार्श्वभूमीवर हे गुणगुणणे आम्हासाठी जरा वेगळे व स्वागतार्ह होते. आणि याचे कारण अर्थातच नव्या बाजाचे गाणे देणारे ए. आर. रेहमान. नव्या ‘रामायण’ चित्रपटातील त्यांचे ‘जय जय राम’ हे गाणे ती गुणगुणत होती.
गंमत म्हणजे जेवढी लोकांनी रेहमानच्या संगीताची टिंगल केली, तेवढीच नव्या पिढीने या नवीन चित्रपटाची गाणी डोक्यावर घेतली. अकल्पित आणि अर्थातच थोडासा विचार करायला लावणारे!
एखाद्याचे संगीत आवडणे वा न आवडणे हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे. आणि काल रात्रीपर्यंत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये धडधडीत लोकशाही जिवंत असल्यामुळे आपली स्वतंत्र आवड जपणे आणि जोपासणे हा प्रत्येकाचा अधिकार आहेच. पण रेहमानला दिलीप म्हणणे हा कोणता आगोचरपणा?
अशी निंदा फारच खालच्या पातळीवरील वाटते. आणि अजून वाईट म्हणजे रेहमान मनापासून आवडणाऱ्या मला अशी विधाने थोडीशी क्लेशकारक वाटतात. कारण रेहमानची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आणि त्यांच्यावरती खालच्या पातळीवरील टीका मला माझ्या घरच्या लोकांवर केलेली टीका वाटते.
याचा अर्थ रेहमानची सर्व गाणी सर्वांनी एका सुराने गावी का? नाही, तसे नाही. कारण तसे केले तर आपण सगळेच एकसुरी आणि बेजोड नाही का होणार?
जसजसे वय थोडेसे वाढते, तसे आपण शहाणे होत जातो. एकूणच पूर्ण शिक्षणपद्धतीचा निकष आणि भर माणसाला कमीत कमी वेळेत चाळीस वर्षांचा शिक्षित, सुसंस्कारित माणूस बनवणे हाच असावा. शहाणपणाची नेमकी महत्त्वाची पातळी म्हणजे मला कुणाचेच वकीलपत्र घ्यायची गरज नाही, याची जाणीव होणे.
अगोदर रेहमानचे उदाहरण दिले. आता अजून एक साने गुरुजींचे देतो व माझा मुद्दा संपवितो.
साने गुरुजी महान देशभक्त होते. ते बहुधा त्या काळातील भारतातल्या फार थोड्या एम.ए. झालेल्या लोकांपैकी एक होते. त्या काळी सुखनैव नोकरी सोडून, समाजसेवा करून, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन त्यांनी भारताचे अक्षरशः निर्माण केले. आपल्या स्वप्नातला भारत त्यांनी बलिदान देऊन घडविला.
बरे, १९४० च्या दशकात महानायक गांधीजींशी वादविवाद करून, गांधींचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी मोकळे केले. आपले दैवत गांधीजींशी मतभेद स्वीकारून दलितांसाठी एवढे काही करणाऱ्या साने गुरुजींना विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठीही वेळ होता.
श्यामची आई, गीता प्रवचने, गोड गोष्टी आणि इतर बरीच ग्रंथसंपदा त्यांनी तयार केली. मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणारी एक पिढी घडवली.
तर नमनाला घडाभर तेल ओतल्यावरती कुणीतरी साने गुरुजींना फदे म्हणावे, मला वाईट वाटावे व मी गुरुजींसाठी भांडावे, याला खरे तर काहीच अर्थ नाही. कारण सत्तर वर्षे उलटून गेली तरी गुरुजी अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.
आजही त्यांनी शिकवलेल्या सोहराब आणि रुस्तुमच्या गोष्टीने एका इराणियन माणसाशी तुमचा सुखसंवाद घडून जातो. गुरुजींच्या रसाळ वाणीने देशोदेशींची भिंत कधीच ओलांडलेली असते. व अशा गुरुजींना कोणत्याही वकिलाची गरज नसते. कारण गुरुजी नेहमी प्रातःस्मरणीयच असतात व राहतील.
तेव्हा यापुढे—नो वकीलपत्र!


r/marathi • • 8d ago

संगीत (Music) Please suggest some sweet romantic Marathi songs.

42 Upvotes

Namaskar, Mandali.

I speak basic conversational Marathi but I don't know any Marathi songs.

Im currently dating a Marathi woman, and I would like to surprise her by singing Marathi songs.

Please suggest any sweet romantic Marathi songs that a man could sing for a woman.

Thanks in advance.


r/marathi • • 8d ago

चर्चा (Discussion) सगळच राजकीय?Everything is political?

3 Upvotes

सगळच राजकीय?Everything is political?

धुवीकरणाचा अतिरेक? काही उदाहरणे-

  1. Atul and Parn Pethe https://www.facebook.com/share/1DkB7nMxei/?mibextid=wwXIfr
  2. Chinmay Damle https://www.facebook.com/share/p/1CKuTNEXG7/?mibextid=wwXIfr
  3. Sharad Bawiskar https://www.facebook.com/share/p/1Dr1EMrnRD/?mibextid=wwXIfr
  4. चिखलफेक केली की थोडा चिखल आपल्याला पण लागणारच ना? म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये सुचिता फार महत्वाची? काही कळायला मार्ग नाही, हे खरं.

r/marathi • • 8d ago

चर्चा (Discussion) मध्यममार्ग की टोकाची भूमिका?

5 Upvotes

मध्यममार्ग की टोकाची भूमिका?
आमीर खानचा ‘फना’, डॅन ब्राउनची ‘द दा विंची कोड’, नंतरच्या काळात ‘पद्मावत’, २०२५ मधील ‘धुरंधर’ आणि आता २०२६ मध्ये ‘रामायण’—या सर्व कलाकृतींबद्दल एक गोष्ट समान आहे. सर्वांच्या प्रदर्शनापूर्वी व नंतर खूप साऱ्या चर्चा, वाद, मतमतांतरे घडून आली. विशेष म्हणजे, डावे व उजवे यांच्या या सिनेमांबाबतच्या भूमिका आत्यंतिक टोकाच्या होत्या व आहेत. त्या वाचून व त्यावरती थोडासा विचार करून थॉमस फ्रीडमन यांच्या “Average is over” या विधानाची आठवण येते.
‘फना’च्या वेळी तर लाडके इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी हे “Celebrity activism” का व कसे धोकादायक आहे, त्यावरती छान मल्लिनाथीही केली होती. पुढील आंतरराष्ट्रीय राजकारणाचीही ती एक छानशी झलकच होती. यामध्ये ध्रुवीकरणाचीही छटा दिसत होती व आहे. मला वाटते, यापुढे पंचवीस वर्षांनी या गोष्टींचा अभ्यास करणारे लोक यावर नक्कीच विचारविनिमय करतील.
कला व संगीत या क्षेत्रांत चूक-बरोबर असे काही नसते. किती गल्ला जमवला, किती लोकांनी सिनेमा पाहिला, या गोष्टी कदाचित महत्त्वाच्या ठरतात. निखळ करमणूक झाली की नाही, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तरीपण, कदाचित एखादा हुशार निर्माता या चर्चेचा धोरणाने वापर करत असावा का? कारण एरवी समंजस वाटणारा क्रिस अशोक जेव्हा व्यायामाबद्दल “चालणे निरर्थक आहे, वजन उचलत जा,” असा व्हिडिओ बनवतो, तेव्हा त्याने हे मुद्दाम तर केले नसेल ना, अशीही शंका येऊन जाते.
मग असाही विचार येऊन जातो की सिनेमा हा तत्कालीन परिस्थितीचा निर्देशक असल्यामुळे, ध्रुवीकरण झालेल्या काळात कदाचित सिनेमाही ध्रुवीय बनतो; तर स्थैर्याच्या काळात ‘अमोल पालेकरी’ नितांत साधा, सुंदर सिनेमा बनतो. काही कळायला मार्ग नाही.
टीप: फ्रीडमन यांचा मूळ संदर्भ रोजगार आणि कौशल्यांचा आहे; इथे त्याचा वापर ध्रुवीकरणाशी साधर्म्य दाखवण्यासाठी केला आहे.


r/marathi • • 8d ago

General उद्या P. L. DESHPANDE फिल्म फेस्टिव्हल madhe आहेत का कुणी?

5 Upvotes

Dadar मध्ये...


r/marathi • • 11d ago

प्रश्न (Question) तुमचा सगळ्यात आवडता मराठी शब्द कोणती आहे?

39 Upvotes

‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌


r/marathi • • 11d ago

चर्चा (Discussion) आज राधे तोरे बदन पर - पंडित जितेंद्र अभिषेकी - सोहोनी

4 Upvotes

पंडित जितेंद्र अभिषेकी - सोहोनी - हा राग मी समर मधे ऐकला होता, आणि आवडला पण होता. गेल्या रविवार पासून त्याचे लिरिक्स आणि दुवा सापडतच नवता. बऱ्याच प्रयत्नांती आज सकाळी सापडला. शेयर करून ठेवतो, परत विसरायला नको. https://youtu.be/p-7_MT8anuw?si=iP9Eu3_5x5W4arLM

आज राधे तोरे बदन पर
राग: रामकली | ताल: एकताल | विलंबित ख्याल

स्थायी:
आज राधे तोरे बदन पर,
श्याम मिले की चोरी रे।

अंतरा:
[प्रमाणित शब्द उपलब्ध नाहीत]

२. जाग रे सलोने बने
राग: रामकली | ताल: एकताल | छोटा ख्याल

स्थायी:
जाग रे सलोने बने, रैन क्यूँ बहाने,
कगवा बोले, चिड़ियाँ चहचहाने लागे।

अंतरा:
तन रंग, मन रंग, रस की बतियाँ,
करूँगी अदा, मैं तो प्रेम कहानी।

https://x.com/nanafadavnis/status/2121595319519703459?a=s7D3CxXl4BV556vR2pM&s=46


r/marathi • • 12d ago

चर्चा (Discussion) Kasa kaay madali ?? 🤓🤓 Marathi madhe cartoon kimva anime baghitle aahet ka tumhi lok ? Mala kaahi suggest Kara, konchya anime baghu mee ?

10 Upvotes

dupari lunch chya duration madhe mala kahi tari pahije time pass karnyasathi ....hehhe


r/marathi • • 12d ago

संगीत (Music) Motivation Friday

7 Upvotes

"सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे." -

..

..

आयुष्यात सुख थोडे आणि संकटे-दुःख फार आहेत. या जगात भलेबुरे दोन्ही अनुभव येतात. एका घावावर दुसरा घाव बसला तरी तो सहन करण्याची आणि त्यावर मात करून लढण्याची ताकद आमच्या अंगात येऊ दे


r/marathi • • 12d ago

प्रश्न (Question) Free Tools to Translate Large, Handwritten Marathi PDFs to English?

9 Upvotes

I need an efficient, free way to translate large, scanned PDF documents from Marathi to English.

The documents are entirely handwritten and contain hundreds of pages, making my current method, of taking screenshots and uploading them to Google Translate, too slow and impractical for bulk work.

Since this is an emergency, I need a free, fast, accurate workflow or tool that can handle large files or bulk translations. Any practical suggestions would be greatly appreciated!


r/marathi • • 13d ago

चर्चा (Discussion) बोलू काही आज निवांत

6 Upvotes

अवांतर गप्पा मारण्यासाठी जरूर डीएम करा....M


r/marathi • • 13d ago

चित्रपट / मालिका (Movies/TV) Is Marathi unofficially the third most prominent language in Hindi pop culture after Hindi and English? Here's my theory

50 Upvotes

I've noticed something interesting about Hindi movies, TV shows and web series, and I have a theory about why it happens.

Marathi seems to enjoy a privilege that almost no other Indian regional language does in mainstream Hindi entertainment: marathi characters are often allowed to speak complete sentences in Marathi, without switching to Hindi or even providing subtitles.

Let me explain with a few examples.

1. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (TMKOC)

The show is arguably Gujarati-centric, with several prominent Gujarati characters. Yet, how often do you hear Jethalal or the other Gujarati characters speaking complete sentences in Gujarati? Most of the time, they speak Hindi with a Gujarati accent, occasionally throwing in Gujarati words.

Now compare that with the Bhide family.

Bhide, Madhavi, Sonu and their relatives frequently speak complete sentences in Marathi, sometimes even during conversations with non-Marathi characters like Jethalal. And these dialogues are rarely translated.

2. Animal (2023)

Ranbir Kapoor's entire family is Punjabi. Yet, throughout the movie, they predominantly speak Hindi. You might hear a few Punjabi expressions here and there, but full-fledged Punjabi conversations are largely absent.

Meanwhile, a Marathi character appears for barely a single scene and gets to speak multiple complete dialogues in Marathi.

Think about that. A film centred around a Punjabi family based in Delhi barely uses Punjabi, but a minor Marathi character gets to speak actual Marathi.

3. Singham

Another example where Marathi characters frequently speak complete Marathi dialogues, despite the film primarily being in Hindi.

4. Chennai Express

Even in a movie set largely in Tamil Nadu, Deepika Padukone's character has a Marathi dialogue.

And this isn't limited to these examples.

Think about how different regional identities are portrayed in Hindi entertainment.

  • Punjabi characters usually speak Hindi with a Punjabi accent, throwing in words like paaji, puttar or balle balle.
  • Gujarati characters speak Hindi with a Gujarati accent.
  • Bengali characters speak Hindi with a stereotypical Bengali accent.
  • Bhojpuri-speaking characters often speak a Hindi-Bhojpuri mixture.
  • Rajasthani, Pahadi and South Indian characters are frequently represented through accents rather than actual regional-language dialogue.

Of course, exceptions exist. But Marathi characters seem unusually likely to speak their actual language, sometimes for several consecutive sentences.

Now here's the interesting part: Most of India doesn't necessarily understand Marathi.

People living in Maharashtra, including non-Marathi speakers, often develop some familiarity with the language through everyday exposure.

But someone who has spent their entire life in Delhi, Punjab, UP, Bihar or another state might not understand even a single Marathi sentence.

Yet Hindi movies and TV shows frequently include these dialogues without subtitles or translations.

Why?

My theory: Maharashtra is simply too important a market for the Hindi entertainment industry to ignore.

Think about it.

Bollywood is based in Mumbai. A significant portion of the Hindi film industry's theatrical business historically comes from the "Bombay distribution circuit", which includes Maharashtra and Gujarat.

Mumbai and the rest of Maharashtra are also major markets for Hindi television, films and OTT content.

So perhaps producers have an incentive to incorporate Marathi characters and actual Marathi dialogue to make Maharashtrian audiences feel represented.

And unlike other regional identities, Marathi characters don't always have to sacrifice their language to fit into a Hindi screenplay.

There could be another explanation too: Since the industry operates out of Mumbai, writers, directors and actors are naturally more familiar with Marathi. It might simply feel more normal to include complete Marathi sentences than complete Bengali, Gujarati or Punjabi sentences.

Local cultural and political sensitivities surrounding Marathi in Maharashtra could also play a role.

Another interesting observation: Hindi films are rarely dubbed into Marathi.

Big Hindi films increasingly get dubbed into several Indian languages, especially Tamil and Telugu, and sometimes other regional languages.

But Marathi dubs of mainstream Hindi films are almost uncommon.

Could this be because the Hindi film industry already considers Marathi-speaking audiences part of its core Hindi-viewing market?

In other words, Marathi audiences are expected to understand Hindi, so dubbing isn't commercially necessary. So, Marathi dialogue is incorporated into Hindi content, perhaps because of Maharashtrian audience's commercial importance.

So my broader theory is this:

Marathi occupies a unique position in Hindi pop culture. It's not necessarily the third most spoken language in Indian entertainment, and Punjabi arguably has a much bigger influence on Bollywood music and vocabulary.

But when it comes to complete, untranslated regional-language dialogue within mainstream Hindi content, Marathi might actually be one of the most prominent languages after Hindi and English.

And that is a very different kind of cultural influence.

I'm not claiming this is statistically proven. It's an observation based on the content I've watched, and I'd be interested to know whether others have noticed the same pattern.

A few questions:

  1. Have you noticed Marathi characters speaking their actual language more frequently than characters from other regions?
  2. Can you think of Hindi films or shows where Gujarati, Punjabi, Bengali, Tamil or other regional languages are used just as freely, without translation?
  3. Do you think this happens because Maharashtra is commercially important, because Bollywood is based in Mumbai, or simply because Marathi is more familiar to the people making these films?

r/marathi • • 13d ago

प्रश्न (Question) What's difference between 𑘮𑘨𑘪𑘩𑘽/हरवलं and 𑘐𑘦𑘪𑘩𑘽/गमवलं in Marathi?

17 Upvotes

‌


r/marathi • • 15d ago

साहित्य (Literature) Poem in Marathi written by me

16 Upvotes

वाचवा माझं भीमाशंकरला वाचवा

हे आहे शेखरू आणि दुसरे प्राण्यांच्या घरं

नाही तुझा बापाचं मालमत्ता

भीमाशंकर माझं महाराष्ट्राची शान भीमाशंकर

तू आहे माझं महाराष्ट्राची शान

तू आहे हे पक्षी-प्राण्यांचा घरं

भीमाशंकर माझं महाराष्ट्राची शान भीमाशंकर

तुझा उपस्थिती आहे हे सुंदर सह्याद्री मधे

तुझा सुंदरता येती पावसाळा मधे

भीमाशंकर माझं महाराष्ट्राची शान भीमाशंकर

तू आहे हे भीमाशंकर मंदिराचं भाग

तू आहे हे शिवाचं भाग

तू पाळतीस एवढं सारे प्राणी

तू प्रसन्न करतीस ते पशुपतीनाथ ला

वाचवा माझं भीमाशंकरला वाचवा

मला माहित आहे तुला काही लोकं तुला नफासाठी वापर करणार आहे

मला माहित आहे हे लोकं तुझे हे प्राणी बाळांना हानी करणार आहे

तू भेऊ नकोस आम्ही हे महाराष्ट्राचे मुले तुला वाचवणार

भीमाशंकर माझं महाराष्ट्राची शान भीमाशंकर

तू आहे आमचे महाराष्ट्राची शान

तू आहे हे पशु-पक्ष्यांची आई

तू आहे ते शिवाचं भाग

तू आहे ते सह्याद्रीचं भाग

भीमाशंकर माझं महाराष्ट्राची शान भीमाशंकर

तुला करतो मी प्रणाम

ओ आई मी करतो तुला प्रणाम

तू एवढं प्राण्यांची आई मी करतो तुला प्रणाम

हे शंकराचे भाग मी करतो तुला प्रणाम


r/marathi • • 15d ago

प्रश्न (Question) Where can I watch hou de dhingana marathi show of siddharth jadhav for free without ads?

3 Upvotes

I just can't find anywhere